Admin
बातम्या
रश्मी ठाकरे मैदानात उतरणार;नाशिकमध्ये भव्य महिला मेळावा घेणार
रश्मी ठाकरे मैदानात उतरणार; रश्मी ठाकरेंचा लवकरच नाशिक दौरा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आता थेट रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. येत्या महिना अखेरीस त्या नाशिकचा दौरा करणार असून महिला मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करतील.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.रश्मी ठाकरे या अनेक राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र त्यांनी आजपर्यंत कधीच राजकीय विषयांवर बोलल्या नाहीत.
रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे. याच्याआधी रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.