Sikandar Trailer Launch : सलमान खानचे रश्मिकाबद्दल वक्तव्य म्हणाला, "मी तिच्या मुलीबरोबरही....."

Sikandar Trailer Launch : सलमान खानचे रश्मिकाबद्दल वक्तव्य म्हणाला, "मी तिच्या मुलीबरोबरही....."

सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. सलमान खानने रश्मिका मंदानाच्या कामाचे कौतुक केले आणि तिच्या मेहनतीचे कौतुक केले. ट्रेलरमध्ये ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च 2025 रोजी प्रदर्शित झाला. यादरम्यान सलमान खानने रश्मिका मंदानाच्या कामाचे कौतुक केले.

'सिंकदर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या चित्रपटामध्ये प्रथमच प्रेक्षकांना सलमान खान आणि रश्मिका मंदाना अशी नवी जोडी पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या वयामध्ये सुमारे 30 वर्षाचा फरक आहे. ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानने रश्मिकाच्या कामाचे कौतुक केले. रश्मिकासोबत काम करताना तरुणपणाचे दिवस आठवत असल्याचे सलमान खानने म्हटले आहे.

सिंकदरच्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानला रश्मिका आणि त्याच्या वयामधील फरक विचारले असता, सलमान खान म्हणाला की, "रश्मिका आणि माझ्यामध्ये 30 वर्षाचा फरक आहे. रश्मिकाचे जेव्हा लग्न होईल, त्यानंतर तिला मुलं होतील. तेव्हा सुद्धा त्यांच्यासोबत काम करेन. त्यांना त्यांच्या पतींची परवानगी मिळेल ना?".

रश्मिकाचे कौतुक करताना सलमान खान म्हणाला की, "'सिंकदर'चे चित्रीकरणाला सुरुवात झाली तेव्हा रश्मिका 'पुष्पा2' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ होती. ती संध्याकाळी 7.00 पर्यंत ती 'पुष्पा2' चे चित्रीकरण करायची. त्यानंतर ती पुन्हा 'सिंकदर'च्या चित्रीकरणाला येत होती. यादरम्यान रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली होती. तरी सुद्धा घरी न बसता तिने शूटींग सुरु ठेवले. एकही दिवस चित्रीकरण रद्द केले नाही. तिच्याकडे पाहत असताना मला माझ्या तरुणपणाची आठवण करु देत आहे."

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सलमान खान ॲक्शन सीन्स पाहायला मिळत आहे. ट्रेलर पहिल्यापासून शेवटपर्यंत खेळवत ठेवले आहे . नेटकऱ्यांनी या ट्रेलरला लाइक कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान सिंकदर चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना यांच्यासोबतच काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर असे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 'बाहुबली' चित्रपटामधील कटप्पाची भूमिका साकरलेले अभिनेते सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com