ratan tata
ratan tatateam lokshahi

रतन टाटा महाराष्ट्रातील पहिल्या 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योगपती आणि समाजसेवी रतन टाटा यांना 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा (Ratan Tata) यांना आज प्रदान करण्यात आला.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुरस्कार सोहळ्यासाठी ते येऊ शकले नसते, यामुळे त्यांना हा पुरस्कार त्यांच्या घरी देण्यात आला.

टाटा यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबतच उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा आणि टाटा समूहाने देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. "रतन टाटा आणि टाटा समूहाचे देशासाठीचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेला हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो", असे एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com