ताज्या बातम्या
Ratan Tata : रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' जाहीर
रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दानशूरपणासाठी रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या ओळखल्या जातात. उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.