रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित
Admin

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या राजदूताने ट्विटरवर ही माहिती दिली की, रतन टाटा यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ'फेरेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रतन टाटा यांनी भारताबरोबरच ऑस्ट्रेलियासाठीही योगदान दिले आहे. ते दिग्गज उद्योगपती आहेत.

ट्विटरवर अनेक फोटोंसह एक पोस्ट शेअर करत फॅरेल यांनी लिहिले की, रतन टाटा हे भारतातील व्यवसाय, उद्योग आणि परोपकाराचे दिग्गज आहेत. त्याच्या योगदानाचा परिणाम ऑस्ट्रेलियातही दिसून आला आहे. फॅरेलने आपल्या ट्विटमध्ये रतन टाटा यांचा सन्मान करणारा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांच्या या ट्विटला यूजर्स सतत रिप्लाय देत आहेत आणि रतन टाटा यांचे जोरदार कौतुक करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com