रत्नागिरी ते मॉरिशस, सीताफळांच्या रोपांची प्रथमच निर्यात, युवा शेतकऱ्याचं पुढचं पाऊल

रत्नागिरी ते मॉरिशस, सीताफळांच्या रोपांची प्रथमच निर्यात, युवा शेतकऱ्याचं पुढचं पाऊल

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील देसाई पिता पुत्रांनी फणस शेतीला ग्लॅमर मिळवून दिलं आहे. मिथिलेश देसाई यांनी मॉरिशसला आता सीताफळाची रोपं पाठवली आहेत
Published by :
Sagar Pradhan
Published on

निसार शेख|रत्नागिरी : कोकणात फळबागांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोगांचा ध्यास घेतलेल्या लांजा मिथिलेश देसाई यांनी सीताफळाची रोपं परदेशात पाठवली आहेत. मिथिलेश देसाई यांच्या वडिलांची ओळख फणसकिंग अशी आहे. मिथिलेश देसाई यांनी भारतातून फणसाची रोपं परदेशात पाठवली होती. मिथिलेश देसाई यांनी आता त्या पाठोपाठ वीस दिवसांपूर्वी सीताफळाची तीनशे रोपं परदेशात मॉरिशस येथे पाठवली आहेत.

पहिल्यांदा सीताफळांची रोपं परदेशात

रत्नागिरी जिल्ह्यातील मिथिलेश देसाई आणि त्यांचे वडील हरिशचंद्र देसाई हे फणसाला ग्लॅमर मिळवून देण्याचं काम करत आहेत. फणसाच्या जवळपास ८० प्रकाराच्या व्हरायटी त्यांच्या बागेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मिथिलेश देसाई यांनी फणसाची रोपं मॉरिशसला पाठवली होती. आता त्यांनी सीताफळाची रोपं परदेशी पाठवली आहेत.सीताफळाच्या फळाची भारतातून परदेशात निर्यात झाली असेल. पण, यावेळी सीताफळाची रोपं पाठवण्यात आली आहेत. मॉरिशस देशातमध्ये तरुण शेतकऱ्याच्या मागणीवरुन रोपांची निर्यात करण्यात आली आहे. उदेश हे मॉरिशस देशातील सीताफळ लावणारे पाहिले शेतकरी असतील, अशी माहिती मिथिलेश देसाई देतात. फणसाप्रमाणेच सीताफळाची ३०० झाडं बिना माती व बिना पाण्याची पाठवण्यात आली आहेत, जी झाड ७ दिवस पाणी आणि माती शिवाय राहू शकतील. विशेष म्हणजे ३०० झाड २ खोक्यातून पाठवण्यात आली आहेत. ज्यांचं वजन फक्त ७ किलो इतकं आहे. देसाई यांची झाड परदेशात पाठवण्याची घोडदौड सुरूच आहे.

लवकरचं काजूच्या रोपांची निर्यात करणार

मिथिलेश देसाई यांनी फणस आणि सीताफळाच्या रोपांची निर्यात केल्यानंतर नवं लक्ष्य ठेवलं आहे. पुढच्या काळात काजूच्या रोपांची निर्यात करण्याची तयारी ते करत आहेत. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञाचा वापर कायमच देसाई यांनी शेतीमध्ये केला आहे आणि त्यामुळे नवनवीन उपक्रम ते हाती घेत आहेत. यापूर्वी त्यांनी फणसाची तब्बल एक टन पान देखील जर्मनीत पाठवली होती. या पानांचा रिसर्च कॅन्सर वरील औषध शोधण्यासाठी सुरू आहे. मिथिलेश देसाई आणि हरिशचंद्र देसाई यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com