राऊतांना जामीन मंजूर; सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर

राऊतांना जामीन मंजूर; सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर

मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. कोर्टाकडून अनेक वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती.

मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. कोर्टाकडून अनेक वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. मात्र, आता राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यावरुनच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया देताना अश्रू अनावर झाले होते. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं, असंही त्यांनी यावेळी त्या म्हणाल्या.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, अखेर 100 दिवसांच्या न्यायालयनी कोठडीनंतर आज सुप्रीम कोर्टानं संजय राऊत यांनी जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.

पत्राचाळ आर्थिक व्यवहारात संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप ईडीने केला होता. या आरोपांखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com