Sanjay Raut : कुबड्या घेवून सत्तेत येण ही भाजपची निती राऊतांचा घणागात

Sanjay Raut : कुबड्या घेवून सत्तेत येण ही भाजपची निती राऊतांचा घणागात

संजय राऊत यांनी नुकताच भाजपावर टीका केली. बाबरी प्रकरणानंतर देशभरात बाळासाहेबांची लाट होती. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे असे त्यांनी म्हटले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • अजित पवार आणि शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे,

  • कुबड्या घेवून सत्तेत येण ही भाजपची निती राऊतांचा घणागात

  • संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले

संजय राऊत यांनी नुकताच भाजपावर टीका केली. बाबरी प्रकरणानंतर देशभरात बाळासाहेबांची लाट होती. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे असे त्यांनी म्हटले. अमित शहांनी काल कुबड्या म्हणून उल्लेख केला. संजय राऊत म्हणाले की, उद्या आम्ही जरी सत्तेत आलो तरीही आम्ही राज्यात विरोधीपक्ष ठेऊ. स्वाभिमान असल्यास एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. वाजपेयींनी बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक न लढवण्याची विनंती केली होती. मतांचे विभाजन होईल, असे त्यांचे मत होते. राजकारणात चढउतार होत असतात. सध्या आम्ही त्यांच्या व्होटचोरीला रोखत आहोत.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, मुळात म्हणजे आम्ही त्यांची व्होटचोरी रोखत असल्याने त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. ज्यावेळी पहिल्यांदा युती झाली त्यावेळी यांना महाराष्ट्रात कोणी ओळखतही नव्हते. यांच्याकडे पोस्टर लावण्यासाठीही कोणी माणसे नव्हती. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्ववाच्या मुद्द्यावर आदेश दिले की, यांचे काम केले पाहिजे. कुबड्या कुबड्या काय सांगता? ते आम्हाला कुबड्या शिकवतात? बाबरीनंतर आम्ही देशभरात निवडणुका लढवणार होतो.

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान येथे आम्ही लोकसभा लढणार होतो. बाळासाहेबांची लाट होती. अटलजी आणि अडवाणी यांनी बाळासाहेबांना विनंती केली. तुम्ही जर निवडणुका लढला तर भारतीय जनता पक्षाचे नुकसान होईल. हिंदुत्वात फुट पडेल. यानंतर बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हा सर्वांना सांगितले की, माघार घ्यायची. नाही तर त्यांना तेव्हा कुबड्या काय असतात हे कळले असते.

पुढे संजय राऊत म्हणाले, अमित शाह हे राजकारणात फार उशिरा आलेत. ते सुद्धा व्यापारी म्हणून आणि व्यापार म्हणून ते राजकारण करत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षात व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली. त्यांना समाजकारण याचे काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे त्यांचे या कुबड्या नको त्या कुबड्या नको हे जे काही सुरू आहे ना.. ते त्यामुळेच. मुलाला क्रिकेटमध्ये टाकायचे.. परिवार वाद हा भाजपाचा तिथून सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com