Sanjay Raut On Dhananjay Munde : मुंडेंच्या परत मंत्रिमंडळात येण्याबाबत राऊतांची स्पष्ट भूमिका म्हणाले...

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील सध्याच्या राजकारणावर आणि अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मत मांडले.
Published by :
Riddhi Vanne

(Sanjay Raut On Dhananjay Munde) संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील सध्याच्या राजकारणावर आणि अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मत मांडले. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अवघड ठरेल, असे ते म्हणाले. मुंडे यांच्यावर गंभीर आरोप सुरू असताना त्यांना मंत्रिमंडळात परत घेणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यवहारावर राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा काळा धंदा आता मोठ्या लोकांपर्यंत पोहोचला असून, महाराष्ट्रातच ड्रग्स तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. साताऱ्यातील एका ड्रग्स प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचे नाव समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढत असून, काही मंत्री गायब आहेत आणि गंभीर आरोप असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी टीका त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे हळूहळू डावपेच आखत असून, योग्य वेळी मोठा निर्णय घेतील, असा दावा संजय राऊत यांनी शेवटी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com