ताज्या बातम्या
Washim : दोघे भावंड विठ्ठल भक्तीत तल्लीन; काम करता करता म्हणतात विठुरायाची भक्तीगीतं
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात असणारे कोकाटे भावंड. शहरात सलून व्यवसाय करणारे दोघे भाऊ रवी कोकाटे आणि बजरंग कोकाटे हे ग्राहकांची कटींग करतानाच विठ्ठल नामाचा जयघोषही सुरू ठेवतात.
पंढरपूरच्या वारीत राज्यातील भाविक तल्लीन असतानाच काही असेही आहेत, ज्यांना पंढरपूर वारी करणे शक्य झाले नाही. असेच वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात असणारे कोकाटे भावंड. शहरात सलून व्यवसाय करणारे दोघे भाऊ रवी कोकाटे आणि बजरंग कोकाटे हे ग्राहकांची कटींग करतानाच विठ्ठल नामाचा जयघोषही सुरू ठेवतात. पंढरीला जाण्याचा योग आला नसल्याने विठुरायाची भक्तीगीतं म्हणून इथूनच विठ्ठल भक्तीचा आनंद घेतात. दोघांच्याही भक्तीगीतांनी ग्राहकांनाही विठ्ठल भक्तीची अनुभूती मिळते.