Uddhav Thackeray, Ravi Rana
Uddhav Thackeray, Ravi RanaTeam Lokshahi

हनुमान चालीसेचा विरोध केला म्हणून त्यांची पार्टी व आमदारही राहिले नाही; रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठनाचा हट्ट धरणारे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राना हे दाम्पत्य राज्यात चर्चेत आले होते

सुरज दहाट, अमरावती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठनाचा हट्ट धरणारे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राना हे दाम्पत्य राज्यात चर्चेत आले होते, तर आज पुन्हा राणा दाम्पत्याने अमरावतीच्या कल्याण नगर येथील मैदानात सामूहिक हनुमान चालीसा पठण केले.

यावेळी नवनीत राणा व रवी राणा यांनी मोठ्या उत्साहात हनुमान चालीसा पठण केलं,तर यावेळी रवी राणा यांनी बोलतांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली, हनुमान चालीसा म्हटलं म्हणून उद्धव ठाकरे यांनी 14 दिवस आम्हाला जेलमध्ये टाकलं होत मात्र त्यांना ते येवढं महागात पडलं कारण त्यांना बजरंगबलीने श्राप दिला, त्यांचे आमदार आले नाही व त्यांची पार्टीही राहिली नाही व त्यांचे पद ही राहाल नाही असा हल्लाबोल रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला, तर जो हनुमानजीचा विरोध करेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही रवी राणा यांनी केली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com