गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?  रविकांत तुपकर यांचा संतप्त सवाल
Admin

गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? रविकांत तुपकर यांचा संतप्त सवाल

रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे ठिकठिकाणी धुमधडाक्यात स्वागत केले

रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे ठिकठिकाणी धुमधडाक्यात स्वागत केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून 10 फेब्रुवारीला आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकर हे आत्मदहन करण्यासाठी आले होते.या वेळी रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापुढेही आंदोलन करू तर सरकारने याची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी त्यांनी दिलाय.

तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील तुमचे घर काचेचे आहे. तुम्ही गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

यासोबतच ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना अनेकवेळा मंत्री केले, त्यां ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केलीय. जे उपकार करणाऱ्या ठाकऱ्यांचे झाले नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये. असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com