रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. पुण्यात काँग्रेसकडून आबा बागुल निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.

मात्र रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल यांचं व्हॉटसअप स्टेटस समोर आलं आहे. 'पुण्यात निष्ठेची हत्या ' असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com