kasba by election :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पैसे वाटत फिरत होते; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

kasba by election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पैसे वाटत फिरत होते; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

कसबा पोटनिवडणूकीतील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कसबा पोटनिवडणूकीतील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. यावरुन त्यांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आता काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 8 वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. असा त्यांनी आरोप केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com