Admin
ताज्या बातम्या
रवींद्र धंगेकरांचा आज मुंबई दौरा, आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट
पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला.
पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करुन रविंद्र धंगेकर हे विजयी झाले. कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत.
रवींद्र धंगेकर यावेळी अनेक आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. रवींद्र धंगेकर आज सकाळी ८ वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत.