RBI ने रेपो रेटमध्ये केली वाढ; 0.25 टक्क्यांनी वाढ
Admin

RBI ने रेपो रेटमध्ये केली वाढ; 0.25 टक्क्यांनी वाढ

भारतीय रिजर्व्ह बँकेने आज रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.

भारतीय रिजर्व्ह बँकेने आज रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. सलग सहाव्यांदा ही वाढ करण्यात आली आहे. घरांच्या पतधोरणामध्ये आता वाढ होणार आहे. महागाईचा दर गेल्या काही दिवसांत कमी आलेला आहे. यापार्श्वभूमीवर रिझव्ह बँक ऑफ इंडिया या पतधोरणात व्याजदरात २५ बेसिक पॉईंटची वाढ केली आहे.

हा रेपो रेट ०.६ बेसिस पॉईंटनं वाढवण्यात आला आहे. त्यामुळं होमलोन महागणार आहेत. रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.  या दरवाढीमुळे ऑटो, सर्व प्रकारची कर्ज महाग होतील. परिणामी ग्राहकांना जास्त ईएमआय भरावा लागेल. विशेष म्हणजे देशातील महागाई नियंत्रणात आल्यानंतरही आरबीआयने दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीची आणि त्यात घेतलेल्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com