RCB In Finals IPL 2025 :  RCB ची फायनल्समध्ये दमदार एन्ट्री; PBKS विरोधात 8 गडी राखून सामना जिंकला

RCB In Finals IPL 2025 : RCB ची फायनल्समध्ये दमदार एन्ट्री; PBKS विरोधात 8 गडी राखून सामना जिंकला

अखेर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्सची टीम आयपीएलच्या फायनल्समध्ये पोहोचली.
Published by :
Rashmi Mane
Published on

अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्सची टीम आयपीएलच्या फायनल्समध्ये पोहोचली. आज, गुरुवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर राऊंडमध्ये आरसीबीनं पंजाब किंग्जला मात देत आयपीएल 2015 च्या अंतिम सामन्यासाठी खेळणाऱ्या पहिल्या संघाचा मान मिळवला आहे. आरसीबीनं सामना सुरू झाल्यावर टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर पंजाबच्या संपूर्ण टीमला अवघ्या 101 धावांवर रोखले. त्यामुळे आरसीबीसमोर केवळ 102 धावांचे आव्हान होते. हे आव्हान आरसीबीनं 10 ओव्हर्समध्ये केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले.

आरसीबीने नऊ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि 2009, 2011 आणि 2016 मध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर एकूण चौथ्या क्रमांकावर राहिला. 1 जून रोजी होणाऱ्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी सामना खेळल्याने पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा संघ 14.1 षटकांत फक्त 101 धावांवर गारद झाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com