देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया
गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीष महाजन म्हणाले की, आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढया मोठ्या संख्येने कोणती महायुती, पक्ष जिंकून आलेला नाही. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद महायुतीला दिलाआहे. आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आम्ही शिक्कामोर्तब केला आहे.
राम कदम म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी सारखा आनंदाचा क्षण आहे. ज्याप्रकारे 2014 ते 2019 पर्यंत काम झाले आता सगळे प्रगती आणि विकासाची काम लवकर होतील. आज सगळ्या महाराष्ट्रातील जनजन या निर्णयावरुन खुश आहे.
पंकजा मुंडे
भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झाली आहे. आणि ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत त्यांची हॅट्रिक झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने जो विश्वास दाखवला आहे त्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खरे उतरु, अस म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभच्छा दिल्या आहेत.
रवि राणा
येणाऱ्या काळात राज्याच नेतृत्व केल पाहिजे. राज्याला पुढे नेल पाहिजे. तेच आज सगळ्यांनी केलं. सर्वाच्या मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे.
उद्यो कोणकोण शपथ घेणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ते तर मला माहित नाही पण, मला एवढा विश्वास आहे की, उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
आशिष शेलार म्हणाले की,
भाजपच्या गटनेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. आणि आता सत्तास्थापनेचा दावा पण करणार. आमच्यासाठी आज दिवाळी आहे.
उद्या कोण-कोण शपथ घेणार? यावर ते म्हणाले की, याबद्दलचा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो. माननीय मुख्यमंत्री म्हणून यावेळी सत्तास्थापनेचा दावा महायुतीकडून राज्यपाल महोदयाकडे केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्री महोदय यावर स्पष्टीकरण आणि उत्तर देतील.