रबर स्टॅम्प, बाहुली बोलण्याआधी द्रौपदी मुर्मूंचा राजकीय इतिहास एकदा वाचाच

रबर स्टॅम्प, बाहुली बोलण्याआधी द्रौपदी मुर्मूंचा राजकीय इतिहास एकदा वाचाच

Draupadi Murmu शांत स्वभावाच्या असल्याने बाहूली आणि रबर स्टॅम्प म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली. परंतु, विरोधकांच्या दावा किती पोकळ आहे हे त्यांचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल.

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी आज शपथ घेतली. विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्या. एनडीएने द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी घोषित करताच विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. द्रौपदी मुर्मू शांत स्वभावाच्या असल्याने बाहूली आणि रबर स्टॅम्प म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली. परंतु, विरोधकांच्या दावा किती पोकळ आहे हे त्यांचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल.

रबर स्टॅम्प, बाहुली बोलण्याआधी द्रौपदी मुर्मूंचा राजकीय इतिहास एकदा वाचाच
Droupadi Murmu : वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पहिले भाषण

द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू 2000 आणि 2009 मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी 2013 ते 2015 मध्ये काम केलं आहे. 2015 साली द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. नोव्हेंबर 2016 या कालावधी झारखंडमध्ये अशांतता पसरली होती. रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दोन शतके जुन्या जमीन कायद्यांमध्ये - छोटा नागपूर टेनन्सी (सीएनटी) आणि संथाल परगणा टेनन्सी (एसपीटी) सुधारणा केल्या होत्या.

रबर स्टॅम्प, बाहुली बोलण्याआधी द्रौपदी मुर्मूंचा राजकीय इतिहास एकदा वाचाच
Droupadi Murmu swearing : द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, मान्यवरांची उपस्थिती

या दुरुस्तीनुसार जमीन औद्योगिक वापरासाठी परवाना देणे सोपे झाले असते. परंतु, या विधेयकाला संपूर्ण झारखंडमधील आदिवासी समाजाने कडाडून विरोध केला आणि निदर्शने केली. हे विधेयक तत्कालीन राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले असता या दुरुस्तीचा आदिवासींना कितपत फायदा होणार, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. तसेच, झारखंडमधील नागरिकांच्या भावना लक्षात घेत मुर्मू यांनी हे विधेयक सरकारला परत पाठविले व याचा नागरिकांना कसा फायदा होईल, यावर संशोधन करण्याच्या सूचनाही दिल्या.

मुर्मू यांचा हा निर्णय घटनात्मक पदांवर बसलेल्या अशा लोकांसाठी उदाहरण ठरला आहे जे पदे भूषवताना पक्षाच्या निर्णयाचा विरोध करण्याची हिंमत करत नाहीत. भाजपशी संबंधित असतानाही दौपदी मुर्मू यांनी पक्षाच्या सरकारने मंजूर केलेल्या वादग्रस्त विधेयकांना संमती देण्यास नकार दिला. यामुळे झारखंडमधील लोकांमध्ये ती आदर आणि कौतुकास पात्र ठरतात.

रबर स्टॅम्प, बाहुली बोलण्याआधी द्रौपदी मुर्मूंचा राजकीय इतिहास एकदा वाचाच
द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती : वाचा, बैदापोसी गाव ते रायसोनी हिल्सपर्यंतचा प्रवास

तर, डिसेंबर 2018 मध्ये रांची येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडी अँड रिसर्च येथे दीक्षांत समारंभ झाला. द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला कुलपती म्हणून उपस्थित होत्या. मुर्मू यांनी आपल्या भाषणादरम्यान स्वातंत्र्य चळवळीतील वकिलांच्या भूमिकेबद्दल बोलताना महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे उघडपणे कौतुक केले होते. संविधान निर्मितीतील या नेत्यांच्या योगदानाचे त्यांनी समर्थन केले.

याशिवाय द्रौपदी मुर्मू यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका करतानाही मागे हटल्या नाहीत. नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत त्या म्हणाल्या की, झारखंड राज्य सरकार (तत्कालीन भाजप) आणि केंद्र सरकार आदिवासींना बँकिंग सेवा आणि इतर योजनांचा लाभ देण्याचे काम करत असले तरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची स्थिती अजूनही तशीच आहे, असा निशाणा त्यांनी भाजप सरकारवर साधला होता.

दरम्यान, भाजपने द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी चेहरा म्हणत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी दिली. निवडणुकीआधीच त्यांचा विजय जवळपास निश्चित होता. आज मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. मुर्मू यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्या भाजपसाठी फायदा किती फायद्याच्या ठरतील हे येणारा काळच सांगेल. परंतु, द्रौपदी मुर्मू यांनी आपली आक्रमकता कायम ठेवल्यास त्यांचे नाव नक्कीच इतिहासात राहील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com