ताज्या बातम्या
Uddhav Thackeray : मराठवाडा दौऱ्यादरम्यान ठाकरेंकरता ठेवण्यात आलेलं रेड कर्पेट आणि VIP खुर्ची हटवली
आचारसंहिता लागू असताना उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर गेले. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
आचारसंहिता लागू असताना उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर गेले. यावेळी धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्या दरम्यान छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरेंकरता व्यासपीठावर रेड कर्पेट आणि VIP खुर्ची ठेवण्यात आली होती, लोकशाही मराठीच्या बातमीनंतर VIP खुर्ची हटवण्यात आली आहे.

