व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात; जाणून घ्या नवीन दर किती?
Admin

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात; जाणून घ्या नवीन दर किती?

1 मे म्हणजेच आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती मोठी कपात करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

1 मे म्हणजेच आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती मोठी कपात करण्यात आली आहे. 1 एप्रिल रोजी म्हणजेच महिनाभरापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 171.50 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

यासोबतच कोलकातामध्ये 1960.50 रुपयांवर पोहचले. चेन्नईमध्ये 2021 रुपयांवर पोहचला आहे. मुंबईमध्ये किंमत 1808 रुपयांवर पोहचली आहे. 1 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती 350.50 रुपये प्रति युनिट आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढवल्या होत्या. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com