Sagali : लग्नाच्या तयारीतील घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट, चौघांचा होरपळून मृत्यू
थोडक्यात
सांगलीतील विटा नगरात एका इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिजच्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.
स्फोटामुळे संपूर्ण इमारत जळून खाक झाली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगी समाविष्ट आहेत.
(sagali) सांगलीतील विटा नगरात एका इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिजच्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण इमारत जळून खाक झाली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगी समाविष्ट आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. या आगीत दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (४७), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (४२), मुलगी प्रियांका इंगळे (२५) आणि नात सृष्टी इंगळे (२) यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेले कुटुंबीय वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु आसपासच्या घरे एकमेकांना चिटकून असल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. विविध स्थानिक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. हा प्रकार संपूर्ण कुटुंबासाठी शोकांतिका ठरला असून, या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली आहे.

