राज्य निवडणूक आयोगातील कर्मचाऱ्यांना दिलासा; मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना आज सुट्टीचा पर्याय

राज्य निवडणूक आयोगातील कर्मचाऱ्यांना दिलासा; मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना आज सुट्टीचा पर्याय

मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. लं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेकडून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. तर ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी ब्लॉक 63 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना आज सुट्टीचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आजच्या सुट्टीच्या बदल्यात इतर दिवशी भरपाई करता येणार आहे.

मेगाब्लॉकमुळे ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होणे कठीण आहे अशा कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी सदर दिवसाची भरपाई करण्यात यावी. असे परिपत्रक निवडणूक आयोगाकडून काढण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com