मंदाकिनी खडसेंना दिलासा; PMLA कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
Admin

मंदाकिनी खडसेंना दिलासा; PMLA कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना दिलासा मिळाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना दिलासा मिळाला आहे. PMLA कोर्टाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालावमध्ये महसूल मंत्री पदी असताना खडसेंनी पुण्यातील भोसरीमधील ३.१ एकर जमिनीचा एमआयडीसीमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ साली करण्यात आला.

या जमीनीची किंमत ३१ कोटी रुपये इतकी असून ती केवळ ३ कोटी ७० लाखांना विकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी या प्रकरणासंदर्भात बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आलाय.

या प्रकरणात आता त्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना २०१६ च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.न्यायालयाकडून त्यांना जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा त्यांना तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे आणि पुराव्यांशी छेडछाड करू नका असे न्यायालयाने त्यांना सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com