आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आला आहे.विविध मागण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. आमच्या वरील मागण्या शासन स्तरावरून मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा संपाच्या माध्यमातून सुरू राहील. संपादरम्यान रुग्णसेवा ढासळण्यास पूर्णतः शासन जबाबदार राहील,असेही निवासी डॉक्टर संघटनेकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

आज सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टर्स राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज संपावर असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com