ताज्या बातम्या
राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर
राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. कोलकातामधील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याची घटना घडली होती.
याच पार्श्वभूमीवर त्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली असल्याची माहिती मिळत आहे.
केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे मात्र या संपाचा रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.