Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Revenue Minister Chandrashekhar Bawankule's tweet reaction after the Vijayi Melava : महाराष्ट्राच्या इतिहासात आज मराठी विजयानिमित्त ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमात दोन्ही ठाकरेबंधू एकत्र मराठी भाषेसाठी लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विट करत दिली आहेत. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयी मेळाव्यावरुन टीका केलीये. उद्धव ठाकरेंचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.
काय लिहिलय बावनकुळे यांनी एक्स पोस्टमध्ये?
मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे.