राज्यभरातील रिक्षाचालक आजपासून संपावर

राज्यभरातील रिक्षाचालक आजपासून संपावर

राज्यभरातील रिक्षाचालक आजपासून संपावर जाणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यभरातील रिक्षाचालक आजपासून संपावर जाणार आहेत. वाहन पात्रता प्रमाणपत्राबाबतच्या केंद्राच्या नव्या नियमांना विरोध करत रिक्षाचालक आजपासून संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईत संप नसणार असल्याची माहिती मिळत आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन विभागाने राज्य सरकारला केल्या आहेत.

या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आजपासून संपावर जाणार आहेत. मुंबई, ठाणे, कोकण वगळता बाकी राज्यात संप करण्यात येणार आहे. या संपाचा फटका प्रवशांना बसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com