Rishabh Pant
Rishabh Pant

IPL 2024: रिषभ पंतला दुसऱ्यांदा मोठा धक्का! आता १२ लाखांचा नव्हे, 'इतक्या' रुपयांचा ठोठावला दंड

कोलकाताना नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव केला. परंतु, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला मोठा धक्का बसला आहे.
Published by :

कोलकाताना नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव केला. परंतु, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला मोठा धक्का बसला आहे. केकेआरविरोधात झालेल्या सामन्यात धीम्या गतीनं गोलंदाजी केल्यानं रिषभ पंतला १२ लाख नाही, तर यावेळी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जविरोधात झालेल्या सामन्यातही धीम्या गतीनं गोलंदाजी केल्यानं पंतवर १२ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. केकेआरने पराभव केल्यानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

आयपीएलकडून दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला स्लो ओव्हर्स रेटच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला. तसच इम्पॅक्ट प्लेयरसह प्लेईंग ११ च्या इतर सदस्यांवर व्यक्तिगतपणे ६ लाख रुपये किंवा त्यांच्या सामन्यातील शुल्काच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करून २७१ धावांचा डोंगर रचला होता. सुनील नारायणे वादळी खेळी करत ८५ धावा केल्या. त्यानंतर आंद्रे रसलने तुफान फटकेबाजी करत १९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्लीचा संघ फक्त १६६ धावाच करु शकला. कर्णधार रिषभ पंतने २५ चेंडूत ५५ धावा केल्या. सुनील नारायणने चमकदार कामगिरी केल्यानं या सामन्यात त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com