Raj Thackeray On BJP: आधी भ्रष्टाचाराचे आरोप, नंतर भाजपमध्ये एन्ट्री, ठाकरेंनी नेत्यांची यादी वाचली
राज ठाकरेंवर निवडणुकीदरम्यान ते भूमिका बदलतात असे आरोप करण्यात आले होते, याच आरोपांवर राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले, नेत्यांची यादी वाचून दाखवली. हिम्मत विश्वा शर्मा हे भ्रष्टाचाराचे पहिले मुर्तिमंत्त प्रतिक आहेत अशी संभावना भाजपने केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
अजित पवारांबद्दल काय बोलणार..- राज ठाकरे
तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले की, हिम्मत विश्वा शर्मा हे आधी दुसऱ्या पक्षात होते त्यानंतर त्यांना स्वतःच्या पक्षात घेतल्यानंतर त्यांना अर्थ, आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली एवढचं नाही तर 2021मध्ये त्यांना मुख्यमंत्री केलं, इथे त्यांची भूमिका नाही बदलली... त्यानंतर बी एस एडी रोप्पा यांना खान घोटाळा प्रकरणी त्यांना दुर केलं आणि सत्ता येत नाही हे पाहून त्यांना पुन्हा पक्षात घेतलं आणि मुख्यमंत्री पद दिलं. अजित पवारांबद्दल काय बोलणार... त्यांच्याबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे, त्याबद्दल काही नवीन सांगण्यासारख नाही असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना देखील धारेवर धरलं आहे..
ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत- राज ठाकरे
तसेच पुढे राज ठाकरेंनी अशोक चव्हाण यांचं नाव पुढे केलं, आदर्श घोटाळा प्रकरणी भाजपने त्यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेत राज्यसभेवर खासदार केल... भाजपचा 370 कलमाला सुरुवातीपासूनचं विरोध होता, असं राज ठाकरेंनी सांगितले तसेच नारायण राणे, किरिट सोम्या, हर्षवर्धन पाटिलं, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सारख्या अनेक नेत्यांवर आरोप केले होते, आणि आता हेच सगळे नेते ज्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.. ते आता मंत्रिमंडळात आहेत किंवा भाजप पक्षात आहेत.. आज कित्येक नेते देव पाण्यात ठेवत आहेत की आमच्यावर आरोप करा... कराण, आरोप करून थेट मंत्रिमंडळात जाता येत, असा आरोप मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी भाजपवर केला आहे.
'यांनी केलं की प्रेम, आम्ही केला की अत्याचार'- राज ठाकरे
प्रत्येक पक्ष त्या-त्यावेळेनुसार आपले निर्णय घेतो, युती करतो, प्रवेश करतो, पण शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस हे पक्ष जे काही करतील ती त्यांची परिस्थिती आणि आम्ही केलं की भूमिकेत बदल, असं का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले की, 'यांनी केलं की प्रेम, आम्ही केला की अत्याचार' मी लोकसभेच्या वेळेस मोदींना देखील म्हणालो की मी एकदा बोललो तर बोललो, तुम्ही जे कराल ते आम्ही बोलणार.. असं राज ठाकरे म्हणाले आहेत. अनेक जण म्हणतात की, राज ठाकरेंनी भाजपमधल्या नेत्यांना भेटलं नाही पाहिजे, पण ज्यावेळेस मी त्यांना भेटतो तेव्हा मी तुम्हाला विकत नाही... असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे.