मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी केडीएमसीतील एक रस्ता खड्डा मुक्त

मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी केडीएमसीतील एक रस्ता खड्डा मुक्त

अवघ्या काही तासात या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आल्याचं दिसून येतेय
Published by :
Sagar Pradhan

अमजद खान| कल्याण: केडीएमसी क्षेत्रात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहे अनेक अपघात घडले मात्र खड्डे भरले गेले नाही मात्र मुख्यमंत्री डोंबिवलीत येत आहेत म्हणून खडबडून जागे झालेले प्रशासनाने खड्डे भरण्यास सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री आज डोंबिवली डीएमसी मैदानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नवरात्र उत्सवानिमित्त येणार आहेत. तेथून ते कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत त्यांच्या मार्गावरील खड्डे आज महापालिकेने भरले आहेत. वारंवार तक्रार करून देखील महापालिकेने दखल घेतली नाही आज मुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळेच का होईना निदान एक रस्ता तरी खड्डेमुक्त होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी केडीएमसीतील एक रस्ता खड्डा मुक्त
कल्याण ग्रामीण पाठोपाठ डोंबिवलीतील 38 बिल्डरांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यांचे अक्षरशः चाळण झाली होती .पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिक देखील त्रस्त होते.या खड्ड्यांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला देखील वाहन चालकांना सामोरे जावे लागतय. खड्डे बुजविण्यासाठी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या आंदोलनं केली निवेदने दिली मात्र खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होतं.

शहरातील काही रस्त्यांवर तर महापालिकेने अक्षरशः दुर्लक्ष केल्यच दिसून येत होतं. आज मुख्यमंत्री डोंबिवली येणार असल्याने खडबडून जागा झालेल्या महापालिका प्रशासनाने त्यांच्या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली अवघ्या काही तासात या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आल्याचं दिसून येतेय. त्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने का होईना पण महापालिकेला निदान खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी सुचली अशी खोचक प्रतिक्रिया दिली

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com