Wardha
WardhaTeam Lokshahi

वर्ध्यात रस्ता सुरक्षा सप्ताह; नई तालीमच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे

डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून दिनांक ३ जानेवारी रोजी बापूंच्या आश्रम परिसरातील नई तालीम मधील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे

भूपेश बारंगे,वर्धा : डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून दिनांक ३ जानेवारी रोजी बापूंच्या आश्रम परिसरातील नई तालीम मधील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे यात्रा निवास मध्ये आरटीओ अधिकारी वर्गांकडून देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर सतत अपघाताची मालिका सुरु असतात. वाहन चालवताना वाहन चालक नियामांचे पालन करीत नाहीत,त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत अपघाता पासून, बचाव करण्यासाठी विविध प्रकारची माहिती व उपक्रम राबविले जात असूनही,वाहन धारक व चालक त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. वृक्षांच्या लहान रोपट्याला आकार दिला ते वृक्ष मोठे झाल्यानंतर सावली देतो त्याच प्रमाणे लहान मुलांना चांगले संस्कार व वाहतूक नियमांविषयी योग्य माहिती दिली तर ती उपयोगात आणली जाते. या करिता उप प्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी मो समीर मो याकूब यांनी अतिशय उपयुक्त संकल्पना मांडली आणि डिसेंबर ते जानेवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात रोड रेस कार्यक्रम शाळकरी मुलांच्या उपस्थितीत राबविण्याचे ठरवले. दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी बापूंच्या आश्रमातील नई तालीम या शाळेतील विद्यार्थ्यांना सोबतीला घेऊन परिसरात असलेल्या यात्रा निवासस्थानी विद्यार्थ्यांना रोड रेस अंतर्गत वाहतुकीचे धडे आरटीओ अधिकारी वर्गांकडून देण्यात आले.लहान मुलांना वाहतूक नियमांविषयी अचूक माहिती दिल्यास ती फायदेशीर ठरते असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले आहे.

Wardha
महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही : चित्रा वाघ

यावेळी उप प्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी नागपूर श्रीमती स्नेहा मेढे,उप प्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी वर्धा,मो समीर मो याकूब,जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, नितेश कराळे, मोटार वाहन निरीक्षक मेघल अनासने, श्रीमती तुषारी बोबडे,विशाल मोरे,श्रीमती साधना कवळे,नागपूर येथील मोटार वाहन निरीक्षक श्रीमती मोनिका राठोड,आदित्य ढोक,अनुराग सालनकर,निखिल कदम,अमर पखाण,विशाल भगत, व नई तालीम शाळेतील मुख्याध्यापिका सुषमा शर्मा, गौरी चांडक जयमाला गावंडे जयश्री कामडे,शरद ताकसांडे,जीवन अवथरे, योगिता गावंडे,प्रशांत ठाकरे किशोर अमृतकर, राजश्री चौधरी, तृप्ती शिंगारे यांच्यासह अनेक आरटीओ येथील कर्मचारी ,शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com