Rohit Arya funeral : पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत रोहित आर्यवर अंत्यसंस्कार, अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक उपस्थित
थोडक्यात
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत रोहित आर्यवर अंत्यसंस्कार
अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक उपस्थित
पुणे पोलिसांच्या बंदोबस्तात मध्यरात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार..
मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून कारवाई करत असताना अरोपी रोहित आर्या याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. 17 चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसांनी रोहित आर्या याच्यावर गोळी झाडली आणि त्यांच्या तावडीतून मुलांची सुटका केली. आता मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्या याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.
रोहित याच्यावर अंत्यसंस्कार…
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्या याच्या मृतदेहावर पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित आर्या याची पत्नी आणि भावाने त्याचा मृतदेह पुण्यात आणला. त्यानंतर मध्यरात्री अंत्यविधीची तयारी सुरु करण्यात आली. अंत्यविधीला पत्नी आणि मुलगा देखील असल्याची माहिती समोर आली. मात्र मुलगा आणि पत्नी तोंडाला स्कार्फ बांधून अंत्यविधीला आलेले. मध्यरात्री 2.30 वाजता रोहित याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतके लोकं होती रोहितच्या अंत्यविधीला उपस्थित
जवळपास 12 नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये रोहित आर्याचा अंत्यविधी पार पडला. रात्री 2.35 वाजता रोहित याला अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यविधीला आलेल्या 12 नातेवाईक देखील तोंडाला स्कार्फ बांधल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंबईतील पवई येथे असलेल्या आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचे एन्काऊंटर केलं. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन राबवले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याच्या छातीजवळ गोळी लागली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. पीएसआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्याचा एन्काऊंटर केला आहे. पर्याय नसल्याने गोळीबार करावा लागला, असे एपीआय वाघमारे यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत..
मिळालेल्या माहितीनुसार, ओलीस ठेवलेल्या 17 मुलांना एका वेबसिरिजसाठी ऑडिशन आयोजित करण्यात आलं आहे… असं सांगत रोहित याने मुलांना आरए स्टुडिओमध्ये बोलावलं होतं… तुमची निवड झाल्यास वेबसिरीजमध्ये काम करायला मिळेल, असे सांगत मुलांना आरए स्टुडिओत बोलवण्यात आले. सकाळी रोहित मुलांच्या पालकांना म्हणाला, ‘मुलांना 10 मिनिटं भेटून घ्या…’ पण त्यानंतर रोहित याने मुलांना ओलीस ठेवलं.
