रोहित पाटलांचा राष्ट्रवादीसह अजित पवारांवर हल्लाबोल

रोहित पाटलांचा राष्ट्रवादीसह अजित पवारांवर हल्लाबोल

पवार साहेबांची मान दिल्लीमध्ये ताठ ठेवायची असेल तर पवार साहेबाच्या मागे जास्तीत जास्त खासदार उभे करण्याचं निर्धार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित आर आर पाटील यांनी केलं आहे.
Published by :
shweta walge

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे रोहित आर आर पाटील यांची सभा पार पडली यावेळी पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आज अखेर आम्ही एक स्वप्न बघतोय की, महाराष्ट्रातून कोणी तरी उठाव दिल्ली काबीज करावी. दिल्लीवरती राज्य कराव आणि ही संधी पवार साहेबांमुळे आम्हाला मिळाली होती. पण तानाजी मालूसरे बनून साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ बनवून कोणीतरी पाय खेचण्याचे काम आमच्याच मातीमध्ये केलं गेलं, असा टोला नाव न घेता रोहित पाटील यांनी अजित पवार गटाला लागवला. त्यामुळे आता सर्वांनी निर्धार करण्याची गरज आहे. पवार साहेबांची मान दिल्लीमध्ये ताठ ठेवायची असेल तर पवार साहेबाच्या मागे जास्तीत जास्त खासदार उभे करण्याचं निर्धार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित आर आर पाटील यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com