रोहित आर .आर. पाटील यांच्या उमेदवाराला संजय काका पाटील गटाकडून धोबीपछाड

रोहित आर .आर. पाटील यांच्या उमेदवाराला संजय काका पाटील गटाकडून धोबीपछाड

दहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती.

संजय देसाई, सांगली

दहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. तर भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने एकादी सत्ता मिळवली होती. मात्र दहा महिन्याच्या आतच खासदार संजय काका पाटील यांनी कवठेमंकाळ नगरपंचायत मधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे.

राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या आहेत. सिंधुताई गावडे यांना नऊ मते मिळाले असून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांना आठ मते मिळाली आहेत.

कवठेमंकाळ नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असून सुद्धा खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या असून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना हा मोठा धक्का बसला आहे. चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com