Rohit Patil : विधानसभेचे वारं या मतदारसंघामध्ये वाहत आहे, पैलवान छोटा असूदे किंवा मोठा त्याचा फरक पडत नाही

Rohit Patil : विधानसभेचे वारं या मतदारसंघामध्ये वाहत आहे, पैलवान छोटा असूदे किंवा मोठा त्याचा फरक पडत नाही

शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला.
Published on

संजय देसाई, सांगली

शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात रोहित पाटील म्हणाले की, अलिकडच्या काळामध्ये केंद्रामधलं, राज्यामधलं सरकार आपण बघतोय खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना देशोधडीला लावण्याचे काम जर कुणी केलं असेल तर या केंद्र सरकारने केलेलं आहे. या राज्यसरकारने केलेलं आहे. दिल्लीमध्ये आपल्या हक्कांसाठी पंजाबमधील शेतकरी आंदोलनाला येऊन बसले. तर त्या आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून या सरकारमधील काही घटकांनी बोलले. उद्या आम्ही जर आंदोलनाला बसलो. तर आम्हालासुद्धा या सरकारमधील घटक दहशतवादी म्हणायला मागेपुढे बघणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. दूधाचे दर पडलेलं आहेत, फसव्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत.

विधानसभेचं वारं या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये फिरलं जात आहे. मी अनेक लोकांशी चर्चा करतो आहे. या मतदारसंघामध्ये फिरतोय. या मतदारसंघातील लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मी आपणाला सांगू इच्छितो की, कुणीही यावं पैलवान छोटा असूदे किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी आपणाला सांगू इच्छितो की, कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातून निवडून येईल आणि सबंध राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळकट करु. राज्यामध्ये, केंद्रामध्ये आपली मान ताठ मानेनं फिरेल. असं रोहित पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com