Rohit Pawar : 35 तडीपार गुंडांना जेलमधून बाहेर काढलं, ते महायुतीचा प्रचार करत होते

अहमदनगरच्या सभेत रोहित पवार यांनी महायुतीवर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अहमदनगरच्या सभेत रोहित पवार यांनी महायुतीवर आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पैशांचा पाऊस हा पलिकडच्या गटाकडून पाडला जात होता. त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट होती तिथे मोठ्या प्रमाणात गुंडाचासुद्धा वापर हा आपल्या विचाराच्या विरोधात तिथे केला होता.

पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 35 अशा गुंडांना ज्यांच्यावर पोलिसांना कारवाई केली होती. त्यांना तडीपार केलं होते. ते सर्व गुन्हे हे बाजूला ठेवून त्यांना जेलमधून बाहेर काढलं. ते कोणाचा प्रचार करत होते ते महायुतीचा प्रचार करत होते. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com