Rohit Pawar : रोहित पवारांकडून राहुल गांधींप्रमाणे थेट फोटो दाखवत मतचोरीची पोल खोल
थोडक्यात
रोहित पवारांकडून मतचोरीची पोल खोल
रोहित पवारांनी थेट त्या व्यक्तीचा फोटोच दाखवला
रोहित पवारा यांनी मतचोरीच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांना घेरलं
मतचोरी आणि मतदार याद्यांचा घोळ यासाठी महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळाने 14 ऑक्टोबरला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्यासोबत तासभर मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतर यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मनसेसह मविआच्या नेत्यांना सरकारला घाम फोडणारे आरोप आणि प्रश्न केले. त्यांनंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट राहुल गांधींप्रमाणे कागदपत्रं घेऊन येत फेक आधार कार्ड कसे बनविले जाते? फेक वेबसाईटचा वापर कसा होत आहे. हे दाखवलं.
रोहित पवारांनी थेट त्या व्यक्तीचा फोटोच दाखवला
रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या चोपन्न हजार मतांच्या घोळ पुराव्यासकट माहिती देत सांगितला. यामध्ये एका रेवांग दवे नावाच्या व्यक्तीने मेथोडोलॉजी सेट केली आहे. ही व्यक्ती भाजपची पदाधिकारी आहे. यामध्ये त्यांनी कोणत्या मतदारांना आणि किती मतदारांना काढायचं या सगळ्यांचं को-ऑर्डिनेशन कसं करायचं या सर्व गोष्टी मॅनेज केल्या.
पण निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. पण त्यांनी त्यांची वेबसाईट हाताळण्याची जबाबदारी दवे नावाच्या भाजपच्या पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीला दिली. त्यामुळे या व्यक्तीकडे सगळी माहिती होती. त्यानुसार त्यांनी मतदारांची संख्या आणि कोणते मतदार ठेवायची या सर्व गोष्टी मॅनेज केले. यासाठी त्यांनी त्यांच्या उमेदवारांची देखील मत विचारात घेतली गेली.
मात्र हीच माहिती जेव्हा आम्ही मागतो त्यावेळी आम्हाला स्पष्ट नकार दिला जातो.त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला मतदार वाढीचे विश्लेषण द्या बीए लोणे त्यांच्या डायरीची माहिती आम्हाला दिली पाहिजे. त्यांनी कोणत्या पद्धतीने हे सर्व क्रॉस व्हेरिफाइड केलं याची पुराव्या आम्हाला द्या अचानक वाढलेले मतदार कोठून आले कसे आले. तसेच एका महिन्यात वाढलेले मतदार या सर्व गोष्टींवर आम्हाला सविस्तर माहिती द्या.असं म्हणत रोहित पवार यांनी थेट पुरावे आणि फोटोच दाखवत मतचोरीच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.