Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवारांना दिलेल्या मानहानीच्या नोटीसप्रकरणी आता स्वतः रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवारांना दिलेल्या मानहानीच्या नोटीसप्रकरणी आता स्वतः रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, मात्र नोटीस प्राप्त झाल्यानंतर आपण कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करू, असं त्यांनी सांगितलं.

रोहित पवार म्हणाले, “कोकाटे यांचा जो व्हिडिओ आहे तो एआय जनरेटेड नाही. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः कृषिमंत्री नसतानाही ‘मी कृषिमंत्री आहे’ असं स्पष्टपणे म्हटलं आहे. आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहिलाच आहे. त्यांनी कृषिमंत्रीपद का गमावलं आणि कशासाठी गमावलं यामागे अनेक कारणं आहेत. याचा खुलासा लवकरच होईल.”

याप्रकरणी कोकाटे यांच्याकडून एआय जनरेटेड असल्याचा दावा केला गेला होता. मात्र, रोहित पवारांनी हा दावा फेटाळला. “जर व्हिडिओ खरोखरच एआय जनरेटेड असता, तर त्यांच्या नेत्यांनी त्यांचं कृषिमंत्रीपद काढून घेतलं नसतं. अजित दादांनाही माहिती आहे की ते आत बसून काय करत होते. त्यामुळे ‘एआय जनरेटेड’ म्हणणं ही गोष्ट थोडी हास्यास्पद वाटते,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

शेवटी त्यांनी स्पष्ट केलं की, नोटीस प्रत्यक्षात मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे कोर्टात आपली बाजू मांडणार आहोत. “सर्वांना माहिती आहे काय घडलं आणि कसं घडलं. आता याचा निपटारा न्यायालयातच होईल,” असं रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com