आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले...

आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले...

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार म्हणाले की, गुंड अजितदादांचा प्रचार करतात. गुडांना वरदास्त कुणाचा आहे तर मग भाजपा आणि अजितदादांचा आहे. त्याच्यात ते धमकावत आहेत, बोलत आहेत. फोनवर धमक्या देतायत. कुठेतरी एक गुंडगर्दी वाढवण्याचा विचार अजित दादांकडून केला जात आहे.

या इलेक्शनमध्ये जर त्यांना फिरवलं जात असेल तर उद्या सत्तेत असणारी लोक त्यांना वरदास्त करतील आणि त्यांचे जे काय गुन्हे असतील ते माफ करतील. सामान्य लोकांना येत्या काळामध्ये कुठेतरी अडचण मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकांना मी विनंती करतो हे जे गुंड आहेत फार चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहेत. आपल्याला योग्य व्यक्तीलाच निवड करायची आहे. गुंडांकडे न बघता आपल्या मनाकडे बघा. आपल्या मताचा योग्य असा वापर करुन योग्य व्यक्तीला निवडून द्या. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com