Rohit Pawar
Rohit Pawar Team Lokshahi

पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात, फक्त तुमचा...; रोहित पवारांनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडूनप्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहीत पवार यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. रोहीत पवार म्हणाले की, महाराष्ट्रातही सामान्य लोक हे निकाल भाजपाच्या विरोधात देतील. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. एवढी ताकद लावूनही कर्नाटकात लोकांनी काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला हे महत्त्वाचं आहे.

तसेच अनेक मोठे नेते कर्नाटकात गेले होते. महाराष्ट्रातल्याही मोठ्या नेत्यांनी तिथे प्रचार केला. तरीसुद्धा भाजपा हरले. महाराष्ट्रातली जनता एवढी सोपी-साधी नाही. पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात ना तिथे? फक्त तो तुमचा नाही हलला, लोकांनी लोकशाहीचा हलवला. मूल जन्मलं एका ठिकाणी, बारसं दुसऱ्या ठिकाणी अशी टीका रोहीत पवार यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com