डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आला समोर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आला समोर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणातील 5 पैकी 3 आरोपी निर्दोष तर 2 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. शरद कळसकर, सचिन अंदुरेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे, संजीव कुनाळेकर यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायालयाचे आभार!

यासोबतच ते पुढे म्हणाले की, परंतु काही आरोपी यातून निर्दोष सुटल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारला अपयश आलं, याचं दुःख होतं. यासोबतच आरोपींना शिक्षा होणं आवश्यक आहेच पण या प्रकरणातील 'मास्टर माईंड' हे मात्र नामानिराळे राहिले आहेत. त्यांच्या मुसक्या आवळून कायद्याने त्यांनाही शिक्षा होणं आवश्यक आहे. असे रोहित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com