Rohit Pawar : दादा भाजपबरोबरच गेले, अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला

Rohit Pawar : दादा भाजपबरोबरच गेले, अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश असे अजित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश असे अजित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, आरोप ज्यांनी केलं त्यांच्याबरोबरच आपण जाऊन बसत असून तर मग त्याचा अर्थ काय निघतो. खरं तर जे लोक खोटं आरोप करतात. त्यांच्याविरोधात ताकदीने लढण्याची आज जरुरत आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकांना लोकांच्या बाजूने लढणारी लोक आज त्याठिकाणी पाहिजे आहेत. दादा भाजपबरोबरच गेले. अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला. आता याच्याबद्दल ते काय बोलतील हे आपल्याला बघावं लागेल. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com