Rohit Pawar : महाविकास आघाडीचं सरकार नसल्यामुळं विरोधक म्हणून आमच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत असल्याने काही प्रश्न मात्र अद्याप कायम

Rohit Pawar : महाविकास आघाडीचं सरकार नसल्यामुळं विरोधक म्हणून आमच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत असल्याने काही प्रश्न मात्र अद्याप कायम

रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. नुकतेच अधिवेशन पार पडलं. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, आमदार म्हणून गेल्या पाच वर्षांत विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात सामन्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम केलं.

त्यातील काही प्रश्न सोडवण्यात यश आलं, काही प्रश्न हे काही प्रमाणात सुटत आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार नसल्यामुळं विरोधक म्हणून आमच्या अनेक प्रश्नांकडं दुर्लक्ष होत असल्याने काही प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे.

यासोबतच रोहित पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि हे प्रश्नही सोडवणार असा विश्वास आहे. पण नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मी मांडलेले प्रश्न आपल्या माहितीसाठी पुढील काही दिवस दररोज शेअर करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com