रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची हि दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली.

निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे ? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com