Rohit Pawar : गृहमंत्री महोदय राज्याची कायदा व सुव्यवस्था अशी वेशीवर टांगली असताना तुम्ही लोकांना कसं तोंड दाखवणार?

Rohit Pawar : गृहमंत्री महोदय राज्याची कायदा व सुव्यवस्था अशी वेशीवर टांगली असताना तुम्ही लोकांना कसं तोंड दाखवणार?

रोहित पवार यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी मालेगावच्या माजी महापौरांवर गोळीबार झाला. आज भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांना गोळ्या घालून ठार मारलं. यापूर्वीही खुद्द आमदारांनीच स्टेजवर आणि पोलिस ठाण्यात गोळीबार केला.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, गृहमंत्री महोदय राज्याची कायदा व सुव्यवस्था अशी वेशीवर टांगली असताना तुम्ही लोकांना कसं तोंड दाखवणार? आम्ही वारंवार मागणी करुनही आपण राजीनामा देत नाही पण किमान गृहखात्याला तरी आपल्या विळख्यातून मुक्त करुन सामान्य माणसांना भयमुक्तीचा श्वास घेऊ द्या! असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com