Rohit Pawar : आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे

Rohit Pawar : आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. यातच आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार यांच्या ट्विटवरुन चर्चा रंगल्या आहेत.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे.

यासोबतच ते म्हणाले की, धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही. पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं! असं रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com