Rohit Pawar : सत्तेचा गैरवापर करून पक्षाचं नाव व चिन्ह जरी बळकावलं असलं तरी #original पक्ष कोणता आहे यावर लोकसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब झालं

Rohit Pawar : सत्तेचा गैरवापर करून पक्षाचं नाव व चिन्ह जरी बळकावलं असलं तरी #original पक्ष कोणता आहे यावर लोकसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब झालं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काल वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काल वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 25 वर्ष पूर्ण झालीत. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉलेजच्या मैदानावर वर्धापन दिन साजरा केला. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून पक्षाचं नाव व चिन्ह जरी बळकावलं असलं तरी #original पक्ष कोणता आहे यावर लोकसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब झालं. म्हणूनच 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा'चा #रौप्यमहोत्सवी_वर्धापन_दिन अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात, दिमाखात आणि जल्लोषात साजरा झाला.

यावेळी आदरणीय पवार साहेबांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा आणि पुढील दिशा याबाबत मार्गदर्शन केलं आणि सर्वांना शुभेच्छा देऊन विधानसभेसह येणाऱ्या पुढील सर्व निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब, शेकापचे अध्यक्ष भाई जयंत पाटील साहेब, खा. सुप्रियाताई, डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब, अनिल देशमुख साहेब, राजेश टोपे साहेब, खा. डॉ. अमोल कोल्हे साहेब, खा.निलेश लंके जी यांच्यासह सर्व नवनिर्वाचित खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com