Rohit Pawar : बदलापूर येथे घडलेली अत्याचाराची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी

Rohit Pawar : बदलापूर येथे घडलेली अत्याचाराची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर रेलरोको आंदोलन करण्यात येत असून रेल्वेसेवा ठप्प आहेत. यावर आता प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, बदलापूर येथे घडलेली अत्याचाराची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दुर्दैवी घटना घडल्यावर दोन दिवस समाज पेटून उठतो, परंतु दुर्दैवाने ही आग दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. दोषींना फाशी द्या ही नागरिकांची तर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा देऊ ही सरकारची नेहमीची प्रतिक्रिया झाली आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, वारंवार अशा घटना घडत असताना आपण व्यवस्था म्हणून काय करतोय याचा विचार करणे गरजेचे आहे. लाडक्या बहिणींच्या, लाडक्या लेकींच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला #शक्ती_कायदा अस्तित्वात आणण्यासाठी अजून अशा किती घटनांची वाट बघणार ? असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com