Rohit Sharma
Rohit Sharma

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा निवृत्ती घोषित करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Published by :

Rohit Sharma Retirement : भारताचा कर्णधार रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकप २०२४ ची कमान सांभाळण्यासाठी सज्ज आहे. वर्ल्डकप जिंकण्यात यावेळी टीम इंडियाला यश मिळले, अशी आशा चाहत्यांना आहे. तत्पूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा जूनमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर सर्वात छोट्या फॉर्मेटमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवृत्ती घेईल, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर आली आहे. कारण या निर्णयामागे हार्दिक पंड्याशी संबंधीत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

आयपीएल २०२४ च्या आधी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाबाबत मोठी निर्णय घेतला होता. ट्रेडच्या माध्यमातून संघात सामील केलेल्या हार्दिक पंड्याला रोहित शर्माच्या जागेवर संघाची कमान सोपवण्याची जबाबदारी देण्यात आली. हा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिक पंड्याला सोशल मीडियावर धारेवर धरलं. रोहित शर्माही या निर्णयामुळं नाराज असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराहसह अन्य खेळाडू आहेत. तर दुसरीकडे हार्दिकला ट्रोल केलं जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्याची टी-२० वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये निवड होऊ नये, असं रोहितचं मत होतं. रोहितच्या या निर्णयाला टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी दुजोरा दिला होता. परंतु, दबावामुळे अष्टपैलू खेळाडू हार्दिकला स्क्वॉडमध्ये संधी देण्यात आली आणि उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली. बीसीसीआय टी-२० फॉर्मेटमध्ये हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून पाहत असल्याचा दावा केला जात आहे. गतवर्षी हार्दिक पंड्याने टीम इंडियाची कमान सांभाळली होती. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर हार्दिक निवृत्ती घोषित करू शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com